22/06/25

मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे

मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून?

गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे

बीड दि. 28(प्रतिनिधी) -मराठा ओबीसी वाद जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील विषय झाला आहे.अशा स्थितीत कुंडलिक खांडे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मारण्याची धमकी देण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. ही मस्ती खांडेत आली कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात खांडेला दंगली घडवायच्या आहेत का?असा सवाल उपस्थित करत या व्यक्तीला बेड्या ठोकून जेरबंद करावे अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात ज्याचे गुटख्याचे, वाळूचे, जुगाराचे बेकायदेशीर धंदे आहेत अशी व्यक्ती पालक मंत्र्यासारख्या व्यक्तीला मारण्याची धमकी देतो. ही मुजोरी कुठून येते. पैसा आणि राजकीय वरदास्तामुळे मंत्र्याला जर हे धमक्या अशा देत असतील तर सामान्य लोकांवर हे काय अत्याचार करत असतील? हा चिंतनाचा विषय आहे. ओबीसी मराठा समाजात सुरू असलेल्या संवेदनशील वातावरणात मंत्र्याला मारण्याचे हे जर षडयंत्र रचत असतील तर त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही. एक दहशतवादीच अशी भाषा करू शकतो. यातुन जिल्ह्यात दंगली घडवण्यात त्यांचा उद्देश असू शकतो. त्याचे पाठीराखे कोण आहेत?यापूर्वी असे कोणकोणते षडयंत्र त्यांनी जिल्ह्यात रचले आहेत. त्याचे पाठीराखे कोण आहेत याचाही शोध घेण्याचा प्रयत्न या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे दिसत आहे आणि तो पोलिसांनी घेतला पाहिजे अशा गुन्हेगार दहशतवादी, समाजा समाजात तेड वाढवणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळाव्यात व याच्यापाठी राख्यांचा शोध घ्यावा असे आवाहन बाबुराव पोटभरे यांनी यादरम्यान केले आहे.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …