21/06/25

अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!

‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!

अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात

*प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट  पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात*

बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी  बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात  झाली. यावेळी शिक्षकांनी मागण्या मान्य करण्यासंदर्भात घोषणा देत शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने दिनांक 12 जुलै 2024  रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात जून 2024 पासून वाढीव 20 टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली. परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही. शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावेत व 15 मार्च 2024 चा जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासाठी  01 ऑगस्ट पासून शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद माध्यमिक विभाग) कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे महाराष्ट्र राज्य कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले आहे. यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता मन २०२३-२०२४ नुसार दि. 01 जून 2024 पासूनचा वाढीव टप्पा आदेश काढावा. 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावे,शेवटच्या वर्गाची पट संख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 करावे. पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात. या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. या वेळी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैजनाथ चाटे सर, नामदेवराव वाघ सर,बापुराव घुले सर, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, औरंगाबाद विभागाचे निरीक्षक विजयसिंह शिंदे सर, मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्ष मुक्ता मोटे मॅडम, दैवशाला मुंडे मॅडम, स्वराज्य शिक्षक संघटनेचे दत्तात्रय चव्हाण सर, बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर, भागवत यादव सर, बाळासाहेब नागरगोजे सर, महादेव शेंडगे सर, दशरथ साबळे, सय्यद रिजवान, वाय. बी. म्हैसनवाड, यु.आर. लहाने, पी.पी.कुलकर्णी, बी. आर. कांबळे, एस.आर. पवार, आर.एल.सोनवणे, एस. आर. काकडे, एस.एम. कोंडमगीरे, डी.एम.शेळके आदी उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …