06/09/25

कुंडलिक बापू खांडे यांना सर्वस्तरातून मतदारांचा चांगला प्रतिसाद ! मोरगाव, अंजनवती भागातून खांडेंना लीड देण्याचा मतदारांचा मानस

कुंडलिक बापू खांडे यांना सर्वस्तरातून मतदारांचा चांगला प्रतिसाद !

मोरगाव, अंजनवती भागातून खांडेंना लीड देण्याचा मतदारांचा मानस

बीड दि १६ (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक बापू खांडे जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे त्यांची नागरिकांशी नाळ निर्माण झाली आहे. जनतेला आपले काम करून घेण्यासाठी आपला हक्काचा माणूस विधिमंडळात गेला पाहिजे या भावनेने बीड मतदार संघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार कुंडलिक बापू खांडे यांना नागरिकांची मोठी पसंती आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुंडलिक बापू खांडे यांना सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बीड विधानसभा मतदार संघात सर्व दूर प्रचार यंत्रणा पोहचली असून मोरगाव, अंजनवती, महाजनवाडी, मसेवाडी भागातून खांडेंना मोठी लीड देण्याचा जनतेचा मानस आहे.
यावेळी या भागातील जनतेने सुशिक्षित आणि धडाडीच्या युवा नेतृत्व असलेल्या कुंडलिक बापू खांडे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला आहे. कुंडलिक खांडे यांच्यासारखे लढावू व धडाडीचे नेतृत्व बीड मतदारसंघाला लाभले आहे. येणा-या काळात बीड मतदारसंघाचा पहिल्यापेक्षा जास्त भरीव विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक बापू खांडे यांनी सांगितले. बीड मतदारसंघातील मोरगाव, अंजनवती, महाजनवाडी, मसेवाडी येथे आयोजित विविध बैठकीत बोलताना सांगितले आहे. बीड मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस म्हणतोय की, कुंडलिक बापू खांडे हे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत. बीड मतदारसंघात त्यांचा जोरदार झंझावात दिसून येत आहे. कुंडलिक खांडे यांच्या सातत्यपूर्ण झंझावाती प्रचार दौ-यामुळे बीड मतदारसंघात खांडे यांची मोठी क्रेझ वाढली आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …