21/06/25
Oplus_131072

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू

महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके

बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस
वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी
दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन दरवाढ आजपासून म्हणजेच 01 जानेवारी 2025 या नवीन वर्षापासून लागू करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून जीवनावश्यक वस्तू सह विविध वस्तूंच्या भावत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या महागाईचा
मोठा फटका सामान्य नागरिकांसह नाभिक व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवांना होत आहे. त्यातच जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, सलून उपयोगी वस्तूंच्या दरात होणारी वाढ, वाढते
वीज बिल, वाढत चाललेले कर्जाचे हप्ते या सर्व आर्थिक विवेंचनात सलून कारागीर अडकला आहे. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करता नाभिक समाज बांधव आणि सलून व्यवसायिकांना मोठा फटका बसत आहे. त्याच बरोबर अनेक अडिअडचणींचा आणि संकटांचा सामना नाभिक समाज बांधव व सलून व्यवसायिकांना करावा लागत आहे. आजच्या स्थितीत कित्येक व्यवसायिकांना आपला उदरनिर्वाह करण्याचा खर्च भागविणे अवघड होत चाललेले आहे. घरखर्च मुलांचे शिक्षण त्याचबरोबर वृद्ध आई-वडिलांचा आजारपणाचा खर्च या सर्व बाबींचा खर्च भागविता भागविता नाभिक समाज बांधव सलून व्यावसायिक हैराण झाले आहेत.
शिवाय दर पाच वर्षाला नाभिक व्यवसाय समाज बांधव दाढी व कटिंगच्या दरात केवळ 20 टक्के दरवाढ करत असतात. कोरोना महामारीच्या आधी म्हणजेच 2019 मध्ये 20 टक्के दरवाढ केली होती. त्यानंतर अद्याप भाव वाढ केलेली नाही. वाढती महागाई आणि पाच वर्षानंतर होणारी दरवाढ लक्षात घेऊन येत्या 2025 या नवीन वर्षामध्ये दरवाढ करण्यासंदर्भात बीड शहरातील नाभिक समाज बांधव व व्यावसायिक बांधवांनी 28 डिसेंबर रोजी बीड शहरातील नीलकमल हॉटेलमध्ये नाभिक समाज बांधवांची आणि सलून व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कटिंग आणि दाढीच्या दरामध्ये 20 टक्क्याने भाव वाढ करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. शिवाय यावेळी नवीन दरवाढीचे फलक प्रत्येकाने आपल्या दुकानात लावावे असेही ठरविण्यात आले. आज 1 जानेवारी 2025 या नवीन वर्षापासून बीड शहरातील सर्व सलूनमधील हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावरती 20 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. याबाबत सलून व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे.

महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके

वाढत्या महागाईचा फटका सलून व्यवसायाला मोठा बसला आहे. नाभिक समाज बांधावर आर्थिक आपत्ती ओढावली. त्यामुळे अनेकांच्या दुकानाचे भाडे थकले.
सरकारकडून कसलीही मदत मिळत नाही. कोरोना महामारी नंतरच्या काळात अनेक दुकानांची भाडेवाढ झाली. फेशिअल, ब्लेड, क्रीम यासारख्या साहित्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. वीज बिल वाढले, त्यामुळे दाढी कटिंगच्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला असल्याचे मत नाभिक समाज संघटनेचे किशोर गाडेकर आणि बीड शहराध्यक्ष सुनील दोडके यांनी सांगितले.
____________________________

 

 

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …