उमरी येथील रामा (जिजा)
बाबू शिंदे यांचे निधन
बीड दि.०१ (प्रतिनिधी)
बीड तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे आज बुधवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. रामा शिंदे यांना उमरी परिसरात जिजा या नावाने ओळखले जात होते. रामा जिजा यांचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळाऊ असा होता. ते सदैव हसतमुख अशा व्यक्तीमत्वाचे होते. शिवाय मोठे धार्मिकवृत्तीचे होते. त्यांच्यावर साधुसंताचा आणि थोर महापुरुषांच्या विचारांचा पगडा होता. त्यांच्या निधनाने उमरी परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुधवार दिनांक १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर उमरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी उमरी आणि उमरी परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक,पत्रकार शेतकरी शेतमजूर यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामा बाबू शिंदे यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.शिंदे. परिवाराच्या दुःखात संघर्ष यात्रा परिवार सहभागी आहे.