21/06/25

बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करा

बीड येथे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन!

केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना देणार निमंत्रण!

शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

बीड दि.३(प्रतिनिधी)-
बीड जिल्ह्यात गेल्या १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत म्हणजे गेल्या १० वर्षात २४३२ शेतकऱ्यांनी शेतातील झाडाला, घरात आडूला गळफास, शेतातील विहीरीत उडी घेऊन, विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची नोंद बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना केवळ 1 लक्ष रुपयांची तुटपुंजी मदत दिली आहे. पीडित कुटुंबांचे आजारपण त्यावरील अवाढव्य औषध उपचार खर्च, मुलांचे शिक्षण, सण -उत्सव दैनंदिन मूलभूत प्रापंचिक गरजा आदी अनेक सांसारिक गोष्टी अर्धवटच आहेत. पूर्ण शिक्षण नसल्याने पीडित कुटुंबातील युवक, युवती बेरोजगार आहेत. त्यांचे विवाह होत नाहीत. त्यांच्या करिअर संबधी कोणालाच सोयरं-सुतक नाही?अशा परिस्थितीत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक आधार देण्यासाठी तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाचा व आत्मसन्मानाचा ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी येत्या दि. 22 व 23 मार्च 2025 रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी दि.2 फेब्रुवारी रोजी बीड शासकीय विश्रामगृहात यासंदर्भात शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची व्यापक बैठक संपन्न झाली. सदर अधिवेशनासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशातील शेती विषयातील तज्ञ मान्यवर, शेतकरी चळवळीतील नेते, कृषी विद्यापीठातील कुलगुरू यांना निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. अधिवेशनात राज्यात घडलेल्या संपूर्ण शेतकरी आत्महत्यांची श्वेतपत्रीका प्रकाशित करुन शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार आहे. या बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, कृषिभूषण शिवराम घोडके,”आप”चे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे ,पत्रकार अविनाश वाघिरकर,बी. डी. लोणकर,ऍड. योगेश शेळके ,ऍड. गणेश मस्के, रामनाथ खोड, रामेश्वर गाडे, सामाजिक कार्यकर्त्या आयेशा शेख, संध्या भोसले, नयना भाकरे, आनंद ढाकणे, पत्रकार दत्ता आजबे ,दादासाहेब वाघमारे, लहू गायकवाड, रघुनाथ नावडे,आदी उपस्थित होते.

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …