राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड “पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलला प्रदान; सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!
पिंपळनेर दि.23(प्रतिनिधी) :
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने
मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मेस्टाने यावर्षीचा राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड ” जाहीर केला. सदरील पुरस्काराचे वितरण ठाणे येथील झालेल्या एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय बेस्ट स्कूल अवार्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थाचालक प्रा. सुरेश सावंत सर, प्राचार्य आणि शाळेच्या सर्व शिक्षक वृंदाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने पिंपळनेर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत त्यांचे करिअर घडवण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. मेस्टाच्या वतीने ग्रामीण भागात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना स्कूलला दरवर्षी बेस्ट स्कूल अवार्ड देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी या बेस्ट स्कूल अवॉर्ड 2025 साठी पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलची निवड करण्यात आली. सदरील पुरस्कार नुकताच ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मेस्टाचे राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील, कोकण विभाग शिक्षक आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाण्याचे आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेवराव दळवी, कार्याध्यक्ष प्रा. विजय पवार, राज्य संघटक अनिल असलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरील बेस्ट स्कूल अवार्ड 2025 पुरस्कार संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष प्रा. सुरेश सावंत यांनी स्वीकारला. बेस्ट स्कूल अवार्ड -2025 मिळाल्याबद्दल संस्थाचालक प्राध्यापक सुरेश सावंत, प्राचार्य आणि शिक्षक वृंदाचे अखिलेश ढाकणे, पांडुरंग चांडक, डॉ. मेघराज पिंगळे, श्रीमंत सानप, संतोष पटाईत, डॉ. राजीव घुगे, प्रा. नजीर पठाण, ज्ञानेश्वर तांबे, प्रा. मस्के, प्रा.धायतडक, प्रा. लाटे यांच्यासह परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिक, पालक यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
__________________________________