18/06/26

२२ जून पासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!

२२ जून पासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे

बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!

बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा द्या या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने २२ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार १ जून २०२६ पासून राज्यातील २०, ४०, ६० आणि ८० टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग तुकड्यांना पुढील वाढीव टप्पा मंजूर मिळणे अपेक्षित होते. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेल्या असताना देखील अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे शिक्षक समन्वय संघ आणि महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने २२ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विना अनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे सर, मराठवाडा निरिक्षक विजयसिंह शिंदे सर, छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर, मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम बीड जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रताप पवार सर, उपाध्यक्ष श्री. रामदास जामकर सर, उपाध्यक्ष श्री. अरविंद सौंदलकर सर,
जिल्हा सचिव श्री. शेख सर, जिल्हा संघटक प्रताप देशमुख सर, जिल्हा सहसंघटक श्री. बाळासाहेब नागरगोजे सर, महिला उपजिल्हा अध्यक्षा दैवशाला मुंढे मॅडम, महिला जिल्हा सचिव सौ. सुरेखा गायकवाड मॅडम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक मोरे सर, बीड तालुका अध्यक्ष श्री. भागवत यादव सर, गेवराई तालुका अध्यक्ष श्री. दीपक गरूड सर, आष्टी तालुका अध्यक्ष श्री. रविंद्र भुकन सर,पाटोदा तालुका अध्यक्ष श्री. अंकुश गवळी सर, शिरूर तालुका अध्यक्ष श्री. दशरथ साबळे सर, माजलगाव तालुका अध्यक्ष श्री. चंद्रशेखर तौर सर, वडवणी तालुका अध्यक्ष श्री. वैजनाथ शिंदे सर, परळी तालुका अध्यक्ष श्री गोविंद आघाव सर, धारूर तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मुंडे यांच्या सह जिल्ह्यातील विविध पदाधिका-यांनी केले आहे.
___________________________

Check Also

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला

​बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर …