21/06/25

अवैध वाळू वाहतूक करणारा टॅक्टर पोलिसांनी पकडला; चालकाला घेतले ताब्यात, ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतूक करणारा टॅक्टर पोलिसांनी पकडला; चालकाला घेतले ताब्यात, ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड दि.२१(प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील सुरळेगावमध्ये चोरट्या मार्गाने
वाळू वाहतूक करणारा टॅक्टर पोलिसांनी पकडला असून टॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती की,
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील सुरळेगाव मध्ये चोरट्या मार्गाने एक टॅक्टर वाळू वाहतूक करणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या मिळालेल्या माहितीवरून सपोनि संदीप पाटील यांनी आपल्या अंमलदार या बाबत सूचना व मार्गगदर्शन करून नदीपात्रात दबा धरून बसण्याचे सांगितले. त्यानुसार टॅक्टर नदी पात्रता वाळू काढण्यासाठी आला असता दोन अंमलदारांनी त्या टॅक्टर चालकाला ताब्यात घेत ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आरोपी आकाश कोंडीराम भंडारे (वय- 22) रा. सुरळेगाव ता. गेवराई याच्या विरोधात चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.ह.पवार, पो.ह. राऊत यांनी केली.

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …