अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे
बीड दि. 10 (प्रतिनिधी)-
राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांनी दिले होते. परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले. टप्पा वाढीचे आश्वासन शासनाने
न पाळल्यामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांत संतापाची लाट उसळली असून संतप्त झालेल्या या सर्व शिक्षकांनी आजपासून तीव्र आंदोलन करण्याचे जाहीर केले. याचाच भाग म्हणून आज पासून राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम करण्याचे
आंदोलन सुरू केले. या आंदोलनात राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक सहभागी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करावे असे आवाहन विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैजनाथ चाटे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्ष मुक्ता मोटे मॅडम, मुंढे मॅडम, प्रतिभा आर्सुळ मॅडम, सुरेखा गायकवाड मॅडम, बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर यांनी केले.
गेली पंधरा वर्षांपासून राज्यामध्ये विनाअनुदानित तत्त्वावर साठ हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करीत आहेत. या सर्व शिक्षकांना अनुदानासाठी आतापर्यंत वेळोवेळी शेकडो आंदोलन केली. शेकडो आंदोलना नंतर या शाळेतील शिक्षकांना 2016 साली 20 टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर तीन-चार वर्षांनंतर पुढील 40 टक्के अनुदानाचा टप्पा मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर 60 टक्क्याचा वाढीव टप्पा अनुदानासाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागले. त्यानंतर 60 टक्के अनुदान प्राप्त झाले. दरम्यान 80 टक्के अनुदान टप्पा वाढीसाठी राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर मोठे आंदोलन केले होते. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 01 जानेवारी 2024 पासून टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु शासनाचे या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे 80 टक्के टप्पा वाढ अनुदान मिळाले नाही. दरम्यान देशात लोकसभा निवडणूक घोषित झाल्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील अनुदान टप्पा वाढीची प्रक्रिया थांबली. 4 जून रोजी लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येताच पुढील टप्पा वाढ केली जाईल असे शासनाकडून आश्वासन दिले. दरम्यान पावसाळी अधिवेशनात निधीसह पुढील टप्पा वाढ होईल असे शासनाकडून विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात होते. दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला भर पावसामध्ये विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. यावेळी शासनाने निश्चित आम्ही या अधिवेशनात टप्पा वाढ करणार आहोत. त्यामुळे हे आंदोलन तातडीने मागे घ्यावे असे आवाहन आंदोलनकर्त्या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले. शासनाने दिलेल्या आश्वासना नंतर विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. दरम्यान शासनाने काल-परवा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना टप्पा वाढ न देता पुन्हा एकदा विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. शासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळे राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली. या सर्वांनी आज पासून राज्यात विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील सर्व शाळेतील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून अध्यापनासह इतर सर्व काम करण्याचे जाहीर केले आहे. सर राज्यातील एकाच वेळेला हे सर्व शिक्षक काळ्या फिती बांधून काम करणार असल्याने या आंदोलनात बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैजनाथ चाटे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, बीड जिल्ह्याचे मार्गदर्शक लक्ष्मण जगताप, मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्ष मुक्ता मोटे मॅडम, प्रतिभा आर्सुळ मॅडम, सुरेखा गायकवाड मॅडम, मुंढे मॅडम बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर, जिल्ह्याचे पदाधिकारी श्री सौंदलकर सर, प्रताप देशमुख सर,श्री शेख सर, रामदास जामकर सर, बीड तालुकाध्यक्ष भागवत यादव सर, मोरे सर, बाळासाहेब नागरगोजे सर, सुरेश कदम सर, यांच्यासह आदींनी केले आहे.
____________________________