कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त
बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा आज पहाटे अचानक फुटला.बंधारा फुटताच भरलेले सर्व पाणी काही मिनिटांत वाहून गेले, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आणि चिंता निर्माण झाली आहे.
बाबत अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील कुकडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने बंधारा बांधला होता. ऐन पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने काही दिवसांपूर्वी फुटला होता. हा बंधारा शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पुन्हा उभा केला होता. या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. मात्र, आज शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अचानक बंधारा फुटला. बंधारा फुटताच बंधाऱ्यातील सर्व पाणी काही तासांत वाहून गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्यामुळे रब्बी पीक कसे घ्यावे याची चिंता या परिसरातील शेतकऱ्यांना लागली आहे. बंधारा वाहून गेल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आणि चिंता निर्माण झाली आहे
बंधाऱ्याच्या या या पाण्यावर गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी आणि उसाची मोठ्या प्रमाणात पिके उभी केली होती. शेतकऱ्यांनी एका एकरासाठी सरासरी दहा हजारांहून अधिक खर्च करून रब्बी हंगामाची शेती उभी केली होती. दोन ते तीन पाण्यांचा पुरवठा झाल्यानंतर पिके जोम धरत असतानाच बंधारा फुटल्याने आता ही पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याचा तुटवडा आणि अचानक आलेल्या संकटामुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाले असून,“निसर्गच कोपला आहे की काय?” अशी भावना अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आता रब्बी हंगामातील पिकांना पाणी कुठून द्यायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ बंधारा दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा रब्बी हंगामातील सर्व नियोजन कोलमडून जाईल, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.
—————
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com