17/07/25

शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..!

18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.15(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशन मध्ये टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणार असे आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पूर्तता करावी म्हणून आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सोबत शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, अधिवेशन संपण्यापूर्वी आश्वासन पूर्तता करावी अशी विनंती केली. यावेळी येत्या 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची घोषित जाहीर करणार असल्याचे सांगितले. यावेळी संकटमोचन मंत्री आदरणीय श्री गिरीश महाजन साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते.
राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान द्या तसेच 14 ऑक्टोबर शासन निर्णयाचे अनुपालन करा या मागणीसाठी 5 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू होते. या मागण्यासाठी 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद आंदोलन तीव्र करण्यात आले होते. या आंदोलनात राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने आझाद मैदानामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनातील सहभागी शिक्षकांची संख्या पाहून सरकारने तातडीने शिक्षकांच्या मागण्या मान्य करत याच चालू अधिवेशन मध्ये अनुदान टप्पा वाढीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळा समवेत झालेल्या बैठकीत दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला. आज मंगळवार दि.15 रोजी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला प्रश्न मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 18 तारखेला टप्पा वाढ अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची घोषणा करणार असल्याचे सांगितले. यावेळी संकटमोचन मंत्री आदरणीय श्री गिरीश महाजन साहेब, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, सोबत पदवीधर आ. श्री सतीश चव्हाण, समन्वयक तथा कृती समितीचे अध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे, संजय डावरे, रहाटे काका उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आमदार जयंत आसगावकर,आमदार मंगेश चव्हाण,आमदार विक्रम काळे,आमदार किरण सरनाईक, आमदार सुधाकर अडबले, आमदार अभिजित वंजारी किशोर दराडे,आमदार निरंजन डावखरे, आमदार ज मो अभ्यंकर माजी आमदार श्रीकांत देशपांडे माजी आमदार दत्तात्रय सावंत, इतर आमदारांची भेट घेतली.आजच्या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे सर संजय डावरे पुंडलिक रहाटे,सदानंद लोखंडे,अजय थुल, भास्कर लहाने शेख कौसर इ उपस्थित होते.
______________________________

Check Also

*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान– उपमुख्यमंत्री अजित पवार*

*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून …