06/09/25

रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख

रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला

— अँड. अजित देशमुख

बीड दि.19 ( प्रतिनिधी ) धोंडराई येथील रोजगार हमीच्या कामातील घोटाळा बाहेर आल्यानंतर गेवराई तालुक्यातील आणखी दहा गावांमध्ये असे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार प्रशासनाकडे तपासणीचा दिला आहे. अहवाल आल्यानंतर अधिकारी किती पारदर्शक काम करतात ? हे कळेल आणि त्यानंतर आपण केंद्राकडे जायचे का राज्याकडे हे ठरवणार असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्याची फसवणूक आणि लुबाडणूक कमी होणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांना लाभ देत असताना अर्धी रक्कम खर्ची घातल्यासारखी परिस्थिती होते. त्यामुळे प्रत्यक्षात काम करताना शेतकऱ्यांना अडचण येतात. याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
रोहयो घोटाळ्याची चौकशी करताना अधिकारी मजेशीर चौकशी करतात. याचे काम त्याला आणि त्याचे काम याला दाखवून घोटाळा लपवण्यात हे अधिकारी माहीर आहेत. मात्र जिओ टॅगिंग वगैरे पाहिले तर हे सर्व प्रकार उघडकीस येतील.
चौकशी समिती नेमली जाते. मात्र चौकशी व्यवस्थित केली जात नाही. या चौकशी समितीचे अहवाल आल्यानंतर ठराविक रस्त्याचे काय झाले, हे कळेल. पांदन रस्ते अथवा रोजगार हमीतले अन्य रस्ते योग्य पद्धतीने तपासली गेले नाही तर त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील.
वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांसह सार्वजनिक कामातील गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्याशिवाय शेतकऱ्याची उन्नती होणार नाही. शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते होणार नाहीत. मग अधिकाऱ्यांची गुर्मी कुठे आणि कशी उतरवायची याचा आम्हाला अभ्यास आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतर तो कोठे देऊन अधिकाऱ्यांची चौकशी लावायची, हे आम्ही ठरवू , असेही ऍड. देशमुख यांनी म्हटले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …