*उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पारंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविणार*
जळगाव दि.७(प्रतिनिधी)-
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हे नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला व आरोग्य असे वेगवेगळे उपक्रम राबवून समाज हिताचे कार्य गेल्या 15 वर्षापासून सतत करत आहे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा विविध उपक्रम फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फाउंडेशनने विविध उपक्रम राबविले फाउंडेशनच्या या उपक्रमांना द ग्रेट बुक ऑफ इंडिया रेकॉर्डने या उपक्रमाची नोंद घेऊन द ग्रेट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद घेऊन राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले आहे त्याचप्रमाणे द ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन पुणे तर्फे फाउंडेशनला भारतीय समाज रत्न पुरस्काराने पद्मश्री नीलिमाताई मिश्रा यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सन 2020 मध्ये फाउंडेशनला आयएसओ मानांकन सुद्धा प्राप्त झालेले आहे. आता नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या एक विद्यार्थी एक विद्यार्थिनी असे एकूण सहा विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी हे पुरस्कार या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतील त्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन या विद्यालयातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार सहा विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतील असे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केले आहे. फाउंडेशन तर्फे पारंबी विद्यालयातील 15 क्रीडा विद्यार्थ्यांना टी-शर्ट सुद्धा मागील वर्षी प्रदान करण्यात आले होते.