पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले सानप व पालवे
यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार
बीड (प्रतिनिधी):- इ.स.2013 साली प्रशासनाच्यावतीने खाते अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालेले व आत्ता शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले परमेश्वर सानप व कुंडलीक पालवे यांचा दि.7 ऑगस्ट 2024 रोजी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांनी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सत्कार केला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, बाबासाहेब जायभाये, पोलीस हवालदार कल्याण तांदळे, विठ्ठल देशमुख, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळे, डॉ.अशोक पालवे, अॅड. विनोद जायभाये आदी उपस्थित होते.