06/09/25

आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठिंबा देऊन सोडविले उपोषण *मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी राणी बाजी यांचे लाक्षणिक उपोषण*

आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठिंबा देऊन सोडविले उपोषण

*मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी राणी बाजी यांचे लाक्षणिक उपोषण*

बीड दि.९ (प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या शेख गुलरूखजहीण किशवरूद्दीन उर्फ राणी बाजी यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी सभापत खुर्शिद आलम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देत आ.संदीप क्षीरसागर यांनी उपोषण सोडवले.
बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या शेख गुलरूखजहीण किशवरूद्दीन उर्फ राणी बाजी यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी सभापती खुर्शिद आलम यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी (दि.८) रोजी लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. यामध्ये मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रात १०% आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरिम रित्या मा.उच्च न्यायालयाच्या मान्यतेने दिले गेलेले शैक्षणिक क्षेत्रातील ५% आरक्षण पुनर्स्थापित करावे. मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण, वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कामध्ये ५०% सवलत अर्थातच शिष्यवृत्ती देण्यात यावी. मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक सहकारी संस्था स्थापना व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, महेमूदकर्ररहेमान समिती या तीन्ही समितींच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात यावी. मुस्लिम समाज संरक्षण कायदा लागू करण्यात यावा. बीड येथे मंजूर झालेल्या अल्पसंख्यांक समाजातील मंजूर असलेल्या मुलींच्या वस्तीगृहाचे तात्काळ काम सुरू करावे. बलभीम चौक येथील जुने तहसील याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे. अशा विविध मागण्यांसाठी राणी बाजी यांनी उपोषण केले. सदरील उपोषणास आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली व मागण्यांना पाठिंबा देत उपोषण सोडविले. यावेळी तालुकाध्यक्ष गोरे साहेब,खुर्शीद आलम अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहर श.प‌,हेमाताई पिंपळे,नगरसेवक आमेर आणण,नगरसेवक मोहसीन मोमीन,कांग्रेस शहराध्यक्ष परवेज कुरेशी,शोईब इनामदार,उप सरपंच शाहेद भाई,शेख मोहसीन,मसलेकर सर,करपे सर,सूर्यकांत जोगदंड,लक्ष्मण पाटोळे, लालासाहेब, आमेर पाशा, भागवत वैद्य, शाहीन पठाण, शकीला सैय्यद, सुवर्णा चव्हाण, नसरीन बाजी, समीना बाजी, स्नेहा खंडागळे, गुंगासे मॅडम, नितीनजी जायभाये, मोमीन गफ्फार, अखील इनामदार, मोमीन शहेबाज सह अनेक मान्यवर उपस्थित होते,

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …