06/09/25

सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्या-शिवराम राऊत

सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्या-शिवराम राऊत

शिरूरदि.१३( प्रतिनिधी)-
हिवरसिंगा-औरंगपूर मधील शेतक-यासाठी भूसंजिवणी कंपोस्ट खत युनिट योजना राबवणे तसेच सन 2023च्या खरिप हंगामी उत्पादन कमी मिळाल्याने सोयाबिन व कपाशी उत्पादक शेतकरी ज्यांनी ई-पीक पाहणी केली त्यांना हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान मिळावे तसेच रायमोह कृषि मंडळातील मलकाचीवाडी, ढोरकरवाडी, खोकरमोह, रायमोह परिसर, खलापूरीसह सर्व ज्या शेतक-यांनी ई-पीक पाहणी केली नाही त्या शेतक-यांना देखील अनुदान प्राप्त व्हावे करिता शासनाकडे पाठपुरावा करून अनुदान मिळवून देण्यासंबंधी निवेदन जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी श्री साळवे यांना शिवश्री कृषिमंडळ हिवरसिंगा यांच्या वतीने अध्यक्ष श्री. शिवराम राऊत यांनी आज १३ ऑगस्ट रोजी दिले. यामध्ये प्रामुख्याने गावागावांतील अंदाजे ६०% पेक्षा अधिक शेतकरी अनुदाना पासुन वंचीत रहात आहेत. बहुतेक शेतक-यांना ई-पीकपाहणी ॲप वापरण्यात समस्या, अनेकांकडे ॲनरॉईड मोबाईल नसणे, ऐनवेळी ॲप डाऊन होणे या संबंधी जाणीव जागृतीचा अभाव असल्याने खरिप 23 मध्ये सर्वच शेतक-यांना सोयाबीन व कपाशी उत्पादनात घट आली आहे. ज्या शेतक-यांनी ई-पीक नोंदनी केली त्यांना अनुदान मिळावे तसेच अनेक तांत्रिक समस्यामुळे ई-पीक नोंदनी करू न शकणारे पण उत्पादनात घट आली आहे अशा सर्व शेतक-यांना देखील अनुदान मिळावे. त्यांच्यावर निसर्गाने तर अन्याय केलाच परंतु शासनाने अन्याय न करता सरसकट या पूर्वी लाल्या रोग तसेच इतर अनुदाना प्रमाणे मिळावे करिता श्री साळवे सरांनी सकारात्मक भूमीका घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी शिवश्री कृषिमंडळ हिवरसिंगा यांना दिले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …