वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
वडवणी दि.१५(प्रतिनिधी)-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा ” या उपक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 3 दिवसाच्या कालावधीत वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्री.अक्षय (भैया) सर्जेराव काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सानप बी. व्ही. सर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जाधव ओ. एम. सर, श्री. सलगर ए. एन. सर व प्रा. सौ. पोतदार एस. बी. मॅडम आदी उपस्थित होते.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वक्तृत्व, गायन, नृत्य, व वेशभूषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणाच्या व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले . तर देशभक्ती गितावर काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले व कार्यक्रमाला रंगत आणली. प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय (भैया ) काळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशाला खुप मोठ्या त्यागातून, संघर्षातून व बलिदानातून स्वतंत्र मिळाले आहे. आपण आपल्या देशाला विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय समारोपामध्ये श्री. सानप सर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या व बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व स्वातंत्र्य दिना बद्ल आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वडमारे डी. बी. सर यांनी केले सौ. शेळके आर. डी. मॅडम यांनी देशभक्तीपर गित सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महानवर एस. बी. सर यांनी तर आभार सौ. प्रा. संदलापूरकर व्हि. पी. मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. आगे महाराज, दीपस्तंभ गुरुकुलचे संचालक श्री. मुंडे सर, माऊली गुरुकुलचे संचालक श्री. जीवन धुळूप सर, पुरुष पालक, महिला पालक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
_______________________