शिक्षक सेनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी विष्णुपंत रसाळ सर यांची निवड!
बीड जिल्हाध्यक्षपदी गौतम चक्रे सचिवपदी सतीश रसाळ
बीड दि.१०(प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज. मो .अभ्यंकर यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अंतर्गत मराठवाडा विभागाच्या सहसचिवपदी प्राचार्य श्री रसाळ विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शिक्षक सेना खाजगी विभाग बीडच्या जिल्हाध्यक्षपदी गौतम चक्रे व जिल्हा सचिवपदी सतीश रसाळ सर यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती मराठवाडा अध्यक्ष प्राचार्य नामदेवराव सोनवणे व बीड , धाराशिव संपर्कप्रमुख दत्ताजी पवार सर यांच्या उपस्थितीत बीड येथे शिक्षक सेनेच्या बैठकीत करण्यात आली. नुतन पदाधिकारी प्राचार्य विष्णुपंत रसाळ, बीड जिल्हाध्यक्ष गौतम चक्रे व जिल्हा सचिवपदी सतीश रसाळ सर यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना बीड जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे, बीड तालुका प्रमुख गोरख शिंगण, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे विभागीय सचिव प्राचार्य जालिंदर पैठणे, सेवा निवृत्त प्राचार्य रामहरी कदम, मुख्याध्यापक लक्ष्मणराव इंगोले, प्राचार्य महादेवराव बजगुडे, प्राध्यापक कळसुले सर, चौगुले सर, शिक्षक सेना जिल्हा परिषद विभाग जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बहिरवाळ सर, मळेकर सर, अनवणे सर, पि.के.रसाळ सर, बारस्कर सर, कवठेकर सर यांच्यासह शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.