17/12/25
Oplus_131072

तपासणी दरम्यान आढळून
आलेले एक लाख जप्त

बीड, दिनांक 04 (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदार संघामध्ये रविवार दि. 03.11.2024 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान एफएसटी (गस्ती) पथकाच्या तपासणी दरम्यान शिवराज पान सेंटर जवळ गाडी क्र. MH 12 FY 7994 (स्विफ्ट कार) मध्ये रु 1.00 लक्ष रुपयांची रक्कम आढळून आली. संबंधित गाडीचालक यांना सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. त्यामुळे सदरील रु. एक लक्ष रक्कम जप्त केल्याचे बीड निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कविता जाधव यांनी कळवले आहे. एफएसटी (गस्ती) पथक क्र.07 पथक प्रमुख श्री. लोकरे व त्यांच्या टीमने ही कार्यवाही केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौजे घाटसावळी, चौसाळा व राजुरी नवगण येथे स्थिरपथक स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच 9 एफएसटी (गस्ती) पथके कार्यरत असून सदरील पथकामार्फत दिवसा व रात्री वाहनाची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
____________________________

Check Also

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी केले स्वागत

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी …