14/12/25

राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती 

राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती 

मुंबई दि.16(प्रतिनिधी)- मराठवाड्यासह कोकणात आज काही तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज शनिवार रोजी दि. १६ रोजी मराठवाड्यासह कोकणातील काही भागात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर सातारा, कोल्हापूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

थंडीची सर्वांना प्रतीक्षा!

यंदा पावसाळा सहा महिन्यांचा झालाय. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू आणि इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबर अखेर थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतमालाच्या नुकसानीची भीती 

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

Check Also

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी केले स्वागत

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी …