स्काऊट गाईड, कब-बुलबुल पथक
नोंदणी कार्यक्रम उत्साहात संपन्न
– गेवराईत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्त व सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित
गेवराई. दि.२२(प्रतिनिधी): .राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथक नोंदणीचा कार्यक्रम पंचायत समिती, गेवराई येथे मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवावृत्ती आणि सामाजिक भान निर्माण व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात गेवराई तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्काऊट-गाईड व कब-बुलबुल विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दादाराव काकडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा स्काऊट-गाईड संघटक योगेश अवढाळ उपस्थित होते. त्यांच्यासह मार्गदर्शक म्हणून वंदना हिरे, नितीन माळी, सिद्धेश्वर मस्के, नितीन कुल्थे, सुनंदा घुगे त्रिगुणा वाघमोडे, ज्ञानेश्वर धंडारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात स्काऊट-गाईड व कब-बुलबुल चळवळीचे महत्त्व, नियम, शिस्तीचे मूल्य, गणवेशाचे स्वरूप आणि प्रशिक्षण शिबिरांचे स्वरूप याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन स्काऊट मास्टर गजानन चौकटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष कोठेकर यांनी मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
—