वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी
*खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम*
नाथापूर दि. 24( प्रतिनिधी )- जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड व ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम सहाय्य साधने वाटपाच्या अनुषंगाने वडवणी तालुक्यात पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन वडवणी येथे दि 24 जुलै 2025 रोजी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वडवणीचे गटविकास अधिकारी उद्घाटन श्री नागरगोजे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चव्हाण, श्री. फुलचंद लुचारे, श्री. सुनील भोंडवे व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना आवश्यक तो लाभ मिळावा, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सर्व दिव्यांगाना अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देऊ, असे गटविकास अधिकारी नागरगोजे यांनी सांगितले. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या दिव्यांग व ज्येष्ठ लाभार्थ्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या एकूण 350 लाभार्थ्यांमध्ये खालील प्रमाणे वर्गवारी होती:
🔹 अस्थिव्यंग लाभार्थी- 138
🔹 मुकबधिर/कर्णबधिर लाभार्थी–33
🔹 मतिमंद लाभार्थी– 38
🔹 दृष्टिहीन / अंध लाभार्थी – 41
🔹 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी – 99
एकूण 350 लाभार्थ्यांची नोंदी झाली.
प्रत्येक लाभार्थ्याची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक कृत्रिम सहाय्य साधनांची निवड व नोंदणी करण्यात आली. या शिबीरामध्ये दिव्यांगांना जयपुरी फुट, कृत्रिम हात, कॅलीपर, व्हिलचेअर, ट्रायसिकल, क्रचेस, वॉकींग स्टीक, ब्रेल किट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र या सह जेष्ठ नागरीका करीता बेल्ट, वॉकर, काठया, चष्मे, कृत्रिम दात, खुबड, कृत्रिम अवयव, कानाची मशिन, व्हिलचेअर कमोडसहीत, सिलीकॉन खोम तकीया, नीब्रेस, स्पायनल सपोर्ट, सरवायकल कॉलर या सह इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमामार्फत वडवणी तालुक्यातील गरजू दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यात अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा मानस आयोजक संस्थांनी व्यक्त केला.या सर्व कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे श्री. हजारे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.