कोट्यवधी रुपये खर्चून तयार
होणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे
गेवराई दि.२६(सुभाष मुळे): बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अर्धवट कामामुळे नागरीकांची त्रेधा तिरपट उडत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून तयार होणारा हा रस्ता आहे. काही ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वीच तीन तेरा वाजण्याचा प्रकार गेवराई शहर व तालुक्यात पहावयास मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा मार्गे राजपिंपरी, गेवराई, रोहीतळ, जातेगाव व सेलु, लोणावळा, मारफळा या रस्त्याचे काम एक वर्षापुर्वीच २० आगष्ट रोजी सुरू करण्यात आले. हे काम हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत राज्य महामार्ग २८-६५ की.मी. ते ३०/८१० निर्माण करण्याकरिता २.१७ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले. तात्कालिन आमदार ॲड. लक्ष्मणराव पवार यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून प्रमाणात काम सुरू झाले होते, परंतु नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर नूतन आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्ष देणे गरजेचे होते. आजच्या स्थितीत सदरील काम रखडल्याने अपघातात वाढ झाली, भर पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळाली अशी सोज्वळ अपेक्षा आहे.
कोट्यावधी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या कामाकडे मुद्दामहून दुर्लक्ष करून ‘बोगस’ मलीदा लाटण्याची भीती व्यक्त होत आहे. गेवराई शहरातून पुर्व पश्चिम दिशेला असलेल्या रोहीतळ, जातेगाव, सेलु, लोणाळा, मारफळा व राजपिंपरी, चकलांबा यांसह अनेक गावांसह हजारो वाहन धारकांचा प्रश्न सुटणारा असेल. बोजवारा उडालेल्या कामांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
***
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com