...अखेर नीता अंधारे यांची बदली; बीड शहर बचाव मंचाच्या प्रयत्नाला यश
नवीन अधिकाऱ्यांना बीड नगरपालिकेच्या दुर्दशे अन् शहराच्या दयनीय परिस्थिती माहिती सांगणार – नितीन जायभाये
बीड दि.01( प्रतिनिधी)-बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची बदली करण्यात आली आहे. अंधारे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सातत्याने लावून धरण्यात येत होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून बीड शहर बचाव मंचाच्या वतीने निवेदने देण्यात आली होती.
नगरपालिकेचा गलथान कारभार व त्यामुळे नागरिकांचे होत असलेले हाल याबद्दल प्रशासनाला सातत्याने अवगत करून देण्याचे काम बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मुख्याधिकारी नीता अंधारे यांची जरी बदली झाली असली तरी त्यांच्या कार्य काळामध्ये झालेल्या सर्व कामकाजांची सखोल कसून तपासणी करण्यात यावी तसेच त्यांच्या कार्य काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून केला जाणारा विकास पूर्णपणे का ठप्प झाला होता याची कारणे जनतेपुढे आली पाहिजे. नीता अंधारे यांच्या डोक्यावर कोणा कोणाचा हात होता व त्यांची कोणत्या राजकीय पुढार्याशी साट-लोट होत हेही उजेडात येण्याची गरज आहे. अंधारे यांच्या काळामध्ये आलेला निधी व नगरपालिके कडे जमा होणारा वसुलीचा पैसा हा कोणाच्या सांगण्यावरून कशा पद्धतीने वापरण्यात येत होता हेही जनतेपुढे येणे तितकेच गरजेचे आहे. येणारे नवीन मुख्याधिकारी लवकरच नगरपालिकेचा कार्यभार हाती घेतील व त्यांच्याकडून चांगला कारभार होईल अशी अपेक्षा बीडची जनतेला नवीन येणाऱ्या मुख्याधिकाऱ्या कडून आहे. बीड शहराच्या व बीड नगरपालिकेच्या दुर्दशे विषयी तसेच शहरातील दयनीय परिस्थिती विषयी येणाऱ्या नवीन मुख्याधिकाऱ्यांना बीड शहर बचाव मंच अवगत करून देणार असल्याचे बीड शहर विकास मंचचे अध्यक्ष नितीन जायभाये यांनी सांगितले.