गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशाही पत्रकार संघाने हिंदू संस्कृती जपली – परशुराम गुरखूदे
द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे यांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न
बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची
हिंदू संस्कृती आहे. त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून लोकशाही पत्रकार संघाने
शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची संस्कृती जपली असल्याचे मत द्वारकादास मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरुखुदे यांनी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने स्थापन झालेल्या गणरायाच्या आरतीच्या प्रसंगी पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हटले. यावेळी त्यांनी बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन देखील केले.
लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने धानोरा रोड परिसरात धानोरा रोडचा राजा गणेश मंडळाच्या नावाने गणरायाची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी द्वारकादास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरुखुदे यांच्या हस्ते ‘श्री’ ची आरती करण्यात आली. आरती नंतर द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे हे उपस्थित नागरिकांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी बोलताना परशुराम गुरुखुदे म्हणाले की, सर्व सण आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे. त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून लोकशाही पत्रकार संघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करत ही संस्कृती जपली आहे. यापुढेही अशीच संस्कृती जपावी असे म्हटले. त्याच बरोबर त्यांनी बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सणासह
ईद सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन केले. सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचे वातावरण आहे या वातावरणात प्रत्येक नागरिकांनी सुरक्षितरित्या रहावे स्वतःची आणि आपल्या शेजाऱ्यांची काळजी घ्यावी असे ही यावेळी गुरुखुदे यांनी सांगितले.
आरती नंतर परशुराम गुरखूदे यांचा सत्कार लोकशाहीचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य व पत्रकार नितेश उपाध्ये यांनी केला. यावेळी लोकशाही पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष आत्माराम वाव्हळ, साहस आदोडे, शिवप्रसाद सिरसाट, श्रीकांत कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी,
आदी उपस्थित होते.