06/09/25

माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे

माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे

बीड दि.१०(प्रतिनिधी): शरद पवार यांनी भारतात पहिल्यांदा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसीचे कल्याण केले. आमच्या सात पिढ्या हा उपकार विसरणार नाहीत. दुसरीकडे या भाजपने ओबीसीसाठी काय केले ? असा सवाल करत तमाम माळी समाज बजरंग सोनवणेंच्या पाठिशी असल्याचे राधाकृष्ण म्हेत्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, आज मराठा समाजाकडे बोट दाखवून ओबीसीला भाजपला मते देण्याचे आवाहन करण्यात येत आहेत, मात्र शरद पवार यांच्या उमेदवाराची जबाबदारी आम्हाला नाकारता येणार नाही. भाजपला ओबीसीचे मते पाहिजे आहेत मात्र भाजपने ओबीसीसाठी काय केले?, उलट शरद पवार यांनी भारतात पहिल्यांदा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसीचे कल्याण केले. आमच्या सात पिढ्या हा उपकार विसरणार नाहीत, ओबीसी समाजाने भाजपला सत्तेतून हाकलून लावले पाहिजे कारण भाजपची भूमिका नेहमी वर्णवादी राहिली आहे. समाजात जातीजातीत तेढ निर्माण करणारे वक्तव्य आणि राजकारण भाजपने केले असल्याचे नाळवंडीचे माजी सरपंच राधाकृष्ण म्हेत्रे यांनी म्हटले आहे.भाजपच्या उमेदवार ज्या आहेत त्यांनी कधीही ओबीसीची भूमिका घेतली नाही, स्वतःची जात म्हणजे ओबीसी नाही, माळी समाजाची अस्मिता असलेले संत अथवा संस्थान कधी उभी करताना त्यांनी मेहनत घेतली नाही. समाजातील हस्तकांच्या मार्फत समाजाची मते लाटण्याचे राजकारण आजवर झालेले आहे. आमचा खरा डीएनए शरद पवार यांचा आहे कारण मंडल त्याची साक्ष असल्याचे म्हेत्रे यांनी म्हटले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …