06/09/25

संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे

संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे

खासदार झाल्यावर पहिले पत्र आरबीआयला देणार!

दीड लाख ठेवीदारांच्या प्रश्नावर ‘बजरंगीवचन’

बीड दि. १० (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट, अर्बन संस्थांनी गोर गरिबांच्या ठेवी बुडवल्या आहेत, अश्या संस्थाच्या विरोधात आपण भूमिका घेणार आणि खासदार झाल्यावर माझ्या सहीचे पहिले पत्र आरबीआयला लिहले जाईल, त्यात मागणी असेल माझ्या जिल्ह्यातल्या ठेवी परत देण्याची भूमिका घ्यावी आणि संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत. लोकसभेत पाहिल्या भाषणात मी ठेवीदारांचे दुख मांडेन, असे अभिवचन बजरंग सोनवणे यांनी दिले. ते कुटेवाडी येथील सभेत बोलत होते.
पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था व त्यांचे संचालक मंडळ कडून ठेवीदारांचे पैसे बुडवले आहेत मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेले अधिकार आणि आरबीआयचे आर्थिक संरक्षण तत्वाने माझ्या जिल्ह्यातील ठेवीदारांना दिलासा मिळवून देऊ. अनेकांच्या घरात लग्नाच्या लेकी आहेत. विद्यार्थ्यांचे उच्यशिक्षण आहे. शेतीचे व्यवहार आहेत. घराचे बांधकाम आहेत. या सर्व कामावर पूर्णविराम आह.े कारण ठेवीदारांचा घामाचा पैसा आहे. आपण आपली खासदारकी सामान्य लोकांच्या विकासासाठी लावणार असून ठेवीदारांचा पैसा परत आणेल, असा शब्द त्यांनी कुटेवाडी येथील सभेत दिला.

चौकट

ठेवी बुडवणारे ‘कुटे’ तर भाजपच्या आश्रयाला

सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केव्हा केला जेव्हा त्यांची बँक बंद पडली. गोर गरिबांचे पैसे, लेकी-बाळीचे लग्न मोडणारे संस्थानिक यांना अभय भाजप देत आहे. भाजपला केवळ श्रीमंत लोक वाचवायचे आहेत आणि ठेवीदार काय मारायचे आहेत का? असा सवाल करत बजरंग सोनवणे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
भाजपला हे पाप फेडावे लागेल. गरीबांचा शाप त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. मी देखील शेतकऱ्याचे दुख जाणतो, गरिबांचे अश्रू ज्या पक्षाला कळत नाहीत त्या पक्षाला गरिबांच्या वेदना माफ करणार नसल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …