06/09/25

जुन्या पद्धतीनेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवा न्यायलयाच्या निर्णया नंतर शिक्षण संचालकांचे पत्र*

*जुन्या पद्धतीनेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवा न्यायलयाच्या निर्णया नंतर शिक्षण संचालकांचे पत्र*

*गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा – मनोज जाधव*

बीड दि.१४ (प्रतिनिधी) आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी स्वयंअर्थसाहाय्यित शाळा , विनाअनुदानित शाळा आणि इंग्रजी शाळा यांचा समावेश करावा आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीने राबवावी असे न्यायालयाने दिलेल्या आदशानुसार शिक्षण संचालक विभागाने नव्याने निर्देश देत जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्या संदर्भात सर्व उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना आदेश देत सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता पूर्वीच्याच पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोर गरीब,वंचित आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खासगी स्वयं अर्थसाहाय्यित , विनाअनुदानित आणि इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. मात्र राज्य शासनाने त्यात सुधारणा करून विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील शासकीय, खासगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खासगी शाळा आरटीई प्रवेशांतून वगळल्या गेल्या. मात्र या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात सादर करण्यात आले होती. न्यायालयाने राज्य शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे शिक्षण विभागाला आता पूर्वीप्रमाणे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील असंख्य गोरगरिब विद्यार्थ्यांचे श्रीमंत विद्यार्थ्यांच्या बरोबरीने चांगल्या शाळेत शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

*गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा – मनोज जाधव*

९ फेब्रुवारी २०२४ राज्य सरकारच्या नियमबाह्य अधिसूचनेबाबत आम्ही वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवत याचा विरोध केला यात आम्ही न्यायालयात देखील लढा लढला त्यात आम्हाला यश मिळाले असून आता आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीने राबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यात शिक्षण संचालक कार्यालयाकडून या संदर्भातले पत्र काढण्यात आले असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना आता इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मत शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हटले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …