06/09/25
Oplus_0

१६ मे रोजी बीड शहरातील कट्टे हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबीर

१६ मे रोजी बीड शहरातील कट्टे हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबीर

बीड दि.१४ (प्रतिनिधी)- शहरातील कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये हाडाची ठिसुळता (ऑस्टिओपोरोसीस) मोफत तपासणी शिबीर गुरुवार दि. 16 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तरी गरजू रूग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
या प्रसिधदीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, हाडाची ठिसुळता (बीएमडी) ही वयाच्या चाळीशीनंतर स्त्री व पुरुष या दोघांमध्ये आढळते. हाडाची ठिसुळता म्हणजे हाडांतील कॅल्शिअम कमी होवून हाडे ठिसुळ व कमकुवत बनतात आणि यामुळे पुढे वरचेवर फ्रॅक्चर व सांधेदुखीचे वयाबरोबर वाढलेले प्रमाण वाढते. स्त्रीयांना रजोनिवृत्तीनंतर वाढत्या वयाबरोबर हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण 30 ते 40 टक्केपर्यंत कमी झालेले आढळते. हाडाची ठिसुळता याच्याकरिता उपचार पद्धती उपलब्ध आहेत. बाहेर इतरत्र ठिकाणी या तपासणीसाठी 1500 ते 2000 रुपये खर्च येणारी ही तपासणी मोफत असून या सुवर्णसंधीचा लाभ घेवून आपल्याला भविष्यात होणार्‍या हाडांच्या आजारावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलकडून करण्यात आले आहे.
सदरील शिबिर कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटल, आदर्श नगर,तहसील ऑफीस रोड, बीड येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी 7020590788 वर संपर्क करावा.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …