06/09/25

इस्कॉन तर्फे बाल उत्सव मोठ्या साजरा

बीड दि.१९ ( प्रतिनिधी):- सावता माळी चौकातील श्री राधा गोविंद मंदिर या ठिकाणी 14 मे ते 19 मे यादरम्यान लहान मुलांसाठी बाल उत्सवाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बीड शहरातील लहान मुलांनी या पाच दिवशी शिबिरामध्ये बाल संस्कार वर्ग, चित्र रंगवणे स्पर्धा, सूर्यनमस्कार, श्लोक उच्चारण, योग व प्राणायाम यावर प्रशिक्षण घेतले. विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, समाजसेवा, स्वच्छता, समाजामध्ये कसे वागावे त्याचबरोबर आपल्या मधील वाईट गुणांवर मात करून चांगल्या गुणांचा कसा विकास करावा, यावरती श्रीमान कृष्णनाम प्रभू ,सुकुमारी देवी दासी, वीरजा गोपी देविदासी व चंद्रमुखी देवी दासी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रविवार दिनांक 19 मे रोजी शिदोड येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील देवस्थानांची माहिती देऊन त्यांचे पावित्र्य कसे राखावे याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती इस्कॉन बीड चे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनाम दास यांनी दिली.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …