स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय उंबरविहीरा शाळेचा 100 टक्के निकाल
35 पैकी 34 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
बीड दि.५(प्रतिनिधी)
पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेत बसलेल्या 35 पैकी 34 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन बहुमान मिळवला आहे. तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. एस एस सी बोर्ड परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातून चि. श्रेयश अशोक मनवर यांने 96.80%घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे चि.ओमराजे महादेव शेंडकर यांने 94.60% घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर कु. नेहा भरत तांबे 94.40% आणि चि. प्रशांत आजिनाथ भाकरे या दोघांनीही समान गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला असल्याने त्यांचे कौतुक होत आहे
शाळेतून 35 पैकी 15 विद्यार्थी 90 % च्यावर गुण मिळवले असून यामध्ये चि. श्रेयश मनवर 96.80% चि.ओमराजे शेंडकर 94.60% कु.नेहा तांबे 94.40चि. प्रशांत भाकरे 94.40% कु सानिका लवांडे 94% ची शुभम देवकर 93% ओमकार तांबे 93% दीपा लवांडे 92.20% कुमारी अश्विनी सदगर 91.20% कुमारी अंबिका भुसणर 91.20% चि कृष्णा रसाळ 90 80% कुमारी अंजली गुळवे ९०.६० % करण गावडे 90.20% चिरंजीव राजेंद्र राजपुरे 89.90% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.शहाजी दादा पवळ व मुख्याध्यापक बोरखडे सर श्री देवकते सर श्री. मनवर सर श्री.खेबडे सर श्री बांमदळे सर नाईकवाडे सर पवार सर गोंदकर सर पवळ मॅडम सचिन सूर्यवंशी शिवाजी साठे, नागरगोजे, येवले आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.