06/09/25

ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे        6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा

ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार!

आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा

बीड दि.30( प्रतिनिधी)-
ज्ञानेश्वर माऊली आळंदी देवाची यांचे आजोबा ब्र गोविंद पंतजी यांचा भव्य दिव्यरथ पालखी सोहळा यावर्षी दिनांक 6 जुलै शनिवार 2024 रोजी बीड येथून प्रस्थान करणार आहे .
आषाढी वारी निमित्त दरवर्षी या पायी वारी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी हा पालखी सोहळा मोठ्या थाटामध्ये मार्गस्थ होणार आहे .या पालखी सोहळ्या चा प्रवास तब्बल बारा दिवसाचा आहे .पालखी मार्ग पाली, रवळस गाव ,चौसाळा ,पारगाव, कुंतलगिरी फाटा वडाचीवाडी ,वाकडी , वडसीगी, बाबळगाव व श्रीक्षेत्र पंढरपूर असा आहे . श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी सोहळा मुक्कामाचे ठिकाण दिनकर चव्हाण यांचा मळा श्री गणेश हॉटेल च्या बाजूला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राहील
वारीमध्ये मुक्कामी ठिकाणी रात्री नामवंत महाराज मंडळींची हरिकीर्तन सेवा होणार आहे. तसेच हरिजागर होणार आहे. यामध्ये भारुड ,गवळणी, अभंग इत्यादीचा भाविक भक्तांना व दिंडीतील वारकऱ्यांना आनंद घेता येणार आहे .
या भव्य दिव्य पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तांनी आपली नोंदणी करून आपल्या पालखी सोहळ्यातील स्थान निश्चित करावे असे आवाहन या पालखी सोहळ्याची नेतृत्व करणारे पालखी प्रमुख ह भ प संगीत विशारद सुग्रीव महाराज डाके यांनी केले आहे. या भव्य पालखी सोहळ्यामध्ये ज्या भाविक भक्तांना सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी खालील मोबाईल नंबर 9834239835 या वर संपर्क करावा. या पायी दिंडी सोहळ्यासाठी विशेष मार्गदर्शन राधाकृष्ण महाराज वाव्हळ व ह.भ. प. श्रीमंत अण्णा वाघमारे यांचे आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …