06/09/25

डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड*

डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड*

शिरूर कासार दि.७(प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर यांची दिनांक 26 जून 2024 रोजी विद्यापीठ कुलगुरू प्रतिनिधी व विभागीय सह-संचालक (उच्च शिक्षण) आणि तीन विषय तज्ञ यांनी प्रोफेसर पदी निवड केली.त्यांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्यस्तरावर अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध आहेत . ते शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, संविधानिक कार्यामध्ये सतत कार्यरत आहेत.त्यांचे स्वतःचे व संपादित असे एकूण तीन ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांचे गेल्या दहा वर्षापासून संविधान प्रचार व संविधान साक्षरतेचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार व गौरवपत्र, सन्मानपत्राने सन्मानित केलेले आहेत .सध्या त्यांचे संशोधन संविधान संस्कृती, संविधानिक राष्ट्रवाद आणि संविधान साक्षरता यावर संशोधन कार्य सुरू आहे.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. श्याम सानप, प्रोफेसर डॉ.अशोक घोळवे,प्रोफेसर डॉ. संजय सावते, डॉ. नवनाथ पवळे, डॉ. विठ्ठल गुंडे, डॉ, पंडित मुळे, डॉ. सुधीर येवले, डॉ. ज्ञानेश्वर येवले, डॉ. संदीप संपाळ डॉ. श्यामा लोमटे, प्रा.प्रीती विधाते आदी प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …