साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे
माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी
पुणे दि.१०(प्रतिनिधी)
विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत नौकरीचा स्वेच्छा राजीनामा देवून पक्षात सक्रीय कार्यरत असलेले व बीड लोकसभेसाठी जनतेच्या पसंतीला उतरलेले प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या पुणे येथील मोदीबाग निवासस्थानी भेट घेऊन आपले पक्ष व सामाजिक कार्य सांगून माजलगाव विधानसभा निवडणूकीसाठी तिकीट द्यावे अशी विनंती केली. या वेळी ईश्वर मुंडे पवार यांना म्हणाले की, साहेब तुम्ही उमेदवारी देऊन मला फक्त लढ म्हणा.. माजलगाव विधानसभा पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सुजान मतदार यांच्या आशीर्वादाने आपणास जिंकून देवू असा आत्मविश्वास खा. शरदचंद्र पवार यांना प्रा. ईश्वर मुंडे यांनी दिला आहे.