06/09/25
Oplus_131072

बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड

उपाध्यक्षपदी अशोक दोडके तर सचिवपदी बापू झांबरे यांची निवड

बीड दि.१(प्रतिनिधी)- शहरातील
नाभिक दुकान मालक संघटनेची २८ डिसेंबर २०२४ रोजी संघटनेचे ज्येष्ठ नागरिक मुकुंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत बीड शहर अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. तसेच या वेळी बीड शहर उपाध्यक्षपदी अशोक दोडके यांची तर सचिवपदी बापू झांबरे यांची निवड करण्यात आली. सुनील दोडके, अशोक दोडके आणि बापू झांबरे यांची निवड होताच या सर्वांचा निवड पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील नाभिक दुकानदारांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नाभिक मालक संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी सोडविल्या जात आहेत. नाभिक समाज बांधवांच्या
अडीअडचणी आणि समस्या याबाबत सांगोपांग विचार व चर्चा करण्यासाठी तसेच संघटनेची या वर्षीची कार्यकारणी निवडण्यासाठी
संघटनेचे जेष्ठ मुकुंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील नीलकमल हॉटेल येथे २८ डिसेंबर २०२४ रोजी नाभिक दुकान मालक संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाभिक समाज बांधवांना व्यवसायात येणाऱ्या अडचणी या संदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. त्यानंतर नाभिक समाजातील व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुनील दोडके हे सदैव तत्पर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मागील दोन वर्षापूर्वी त्यांची नाभिक व्यवसाय संघटनेच्या बीड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या दोन वर्षात दोडके यांनी नाभिक समाज बांधवांच्या आणि व्यवसायीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रचंड काम केले. त्यांच्या कामावर सर्व नाभिक समाज बांधव आणि व्यावसायिक प्रचंड खुश आणि मोठ्या प्रमाणात समाधानी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची तिसऱ्यांदा त्यांची बीड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवाय या वेळी उर्वरीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी अशोक दोडके सचिव बापू झांबरे, संघटक बाळासाहेब जाधव, सदस्य म्हणून अरुण टाकळकर, नवनाथ दोडके, अक्षय जाधव, किरण काळे, दादा राऊत, अक्षय सुरवसे, अनिल दोडके यांची निवड करण्यात आली.
या बैठकीसाठी गौतम नाना बिडवे, धर्मराज वाघमारे, दिलीपराव वखरे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे, महाराष्ट्र नाभिक आरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष किशोर गाडेकर, विठ्ठलराव घोडके, संतोष काशीद, गोविंद दोडके, संतोष ठोंबरे, अरुण टाकळकर, विशाल वाघमारे, किशोर शिंदे, बप्पा घोडके, माऊली वैद्य, बालाजी वैद्य, राजू चोपडे, सोमनाथ व्यवहारे, किरण काळे, लहू घोडके, संतोष काशीद, विक्रम बाप्पा बिडवे, नारायण सुरोशे, सदाशिवराव बिडवे, राजेंद्र बिडवे, बंडू भंडारे, गणेश सुरवसे, अक्षय सुरवसे, बंडू टाकळकर, विकास सुरवसे, सुदर्शन राऊत, किरण काळे, अशोक वैद्य, शंकर गवळी यांच्यासह बीड शहरातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
__________________________

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …