06/09/25
Oplus_131072

गितांजली लव्हाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारा पाठोपाठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर *१२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार सन्मान *नवीन वर्षात दोन दोन पुरस्कार जाहीर *मान्यवरासह अनेक संस्थांनी केला त्यांचा सत्कार

गितांजली लव्हाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारा पाठोपाठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

*१२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार सन्मान

*नवीन वर्षात दोन दोन पुरस्कार जाहीर

*मान्यवरासह अनेक संस्थांनी केला त्यांचा सत्कार

वडवणी दि.०३(प्रतिनिधी)-
वडवणी येथील निर्भिड पत्रकार तथा इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती गितांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. त्या पाठोपाठ त्यांना मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार १२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एकाच आठवड्यात दोन-दोन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाय वडवणी शहरातील अनेक मान्यवरांसह विविध संस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या बाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यासह जिल्ह्यात एक निर्भिड महिला पत्रकार म्हणून गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम काम करत आहेत.
वडवणी तालुक्यामध्ये खमक्या जिगरबाज डॅशिंग महिला पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तसेच त्या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून अध्यापनाचे ही काम करत आहेत. पत्रकारिता आणि शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना त्यांनी वडवणी पोलीस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता कमिटीच्या सदस्या म्हणून यशस्वी काम केले आहे. या वेळी त्यांनी अनेक महिलांना मदत आणि न्याय मिळवून दिला आहे. त्याच बरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भरीव काम केले आहे. त्या नेहमी गरजू महिलांना मोफत साड्यांचे व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करत आहेत. या त्यांच्या सर्व कार्याची दखल घेत त्यांना नुकताच मैत्री फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या पाठोपाठ त्यांना मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार पाठोपाठ आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 या नवीन वर्षामध्ये जाहीर झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांचा वडवणी शहरातील अनेक मान्यवरांसह विविध संस्थांनी सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
_______________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …