06/09/25
Oplus_131072

अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचा लढा सुरूच! कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन -उपमुख्यमंत्री अजित पवार

अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचा लढा सुरूच!

कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन -उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर दि.२७(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी अनुदान पात्र असणाऱ्या शाळांना अनुदान व अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ देण्याबाबत निवेदन सादर केले. या मागणीवर प्रतिसाद देताना अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी अनुदान पात्र व अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही पद्धतीने काहीही शब्द नकारात्मक बोलले नाहीत. या अधिवेशनामध्ये अचानकपणे बजेट वाढल्याने हा मुद्दा निकाली लागला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक श्री हेमंत धनवडे सर, हातकणंगले तालुकाध्यक्ष वि.ह. सपाटे सर, मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे सर, श्री मुकुंद चव्हाण सर नरसिंह महाजन सर, श्रीमती अमृता शेट्टी मॅडम, सुप्रिया पवार मॅडम उपस्थित होत्या.

विनाअनुदान शाळांना 100% अनुदान मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार- श्री खंडेराव जगदाळे

विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या हक्काच्या पगारासाठी आम्ही जो लढा सुरू केला आहे. हा लढा मागील काही दिवसापासून अधिक तीव्र होत आहे. अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढ अनुदान मंजुर करून देणे. त्याच बरोबर त्यांच्या पदरात 100% अनुदान पडे पर्यंत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचा संघर्ष कायम सुरूच राहणार असल्याचे कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
____________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …