06/09/25

अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश!

अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व
उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत
82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश!

बीड दि.05 (प्रतिनिधी )- शहरापासून जवळच असलेल्या अंथरवन पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी मोनिका राजेभाऊ सिरसाट हिने इयत्ता 12 वी (कला शाखा) परीक्षेत 82.17 टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन करून माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिचे आईवडील, कॉलेज प्रशासन, नातेवाईक आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी अभिनंदन केले आहे.
माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथील रहिवासी असणारे अशिक्षित परंतु मोठं कुटुंब या मोठ्या कुटुंबात गरिबी परिस्थिती असतानाही खचून न जाता दिवस-रात्र काबाडकष्ट मेहनत करून आपल्या लाडक्या सात ही कन्यांचे शिक्षण आणि त्यांचे यशस्वी संगोपन, विवाह करणाऱ्या राजाभाऊ सिरसाट आणि त्यांच्या पत्नी सौ. लता सिरसाट या दांम्पत्याने आपल्या सातही मुलींना उच्च शिक्षण दिले. काही मुलींचे विवाह करून त्यांचा सुखाचा संसार सुरू करून दिला. सातव्या क्रमांकाची मुलगी कु. मोनिका हिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. परंतु परिस्थितीमुळे तिला विज्ञान शाखेला प्रवेश घेता आला नाही. दरम्यान तिने कला शाखेत प्रवेश घेऊन परिस्थितीवर मात करून हलाकीच्या परिस्थितीत प्रचंड अभ्यास करून परिस्थितीवर मात केली. मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेमध्ये मोनिका सिरसाट हिने 82.17 टक्के गुण संपादित करून अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून तिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे आईवडील, संस्थेचे संस्थाचालक दिनेश पवार साहेब, प्राचार्य खंदारे सर, प्रा.पवार सर, प्रा.सिरसाट सर, प्रा. आखाडे सर, प्रा. श्रीमती तांबे मॅडम, प्रा.श्रीमती लगसकर मॅडम, सहशिक्षिका श्रीमती कांबळे मॅडम, सहशिक्षिका श्रीमती खंदारे मॅडम यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, नातेवाईक आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …