पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे
बीड दि.१० (प्रतिनिधी ): पाली सर्कल मधील हिवरापहाडी व बोरफडी या गावामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक घेतली असता. या बैठकीला सर्कलमधील महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बप्पासाहेब घुगे यांनी सांगितले की, महायुतीच्या उमेदवार पकजाताई यांना निवडून देण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी व सर्व जाती धर्मातील लोकांनी एकमुखाने
पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्याचा संकल्प केला असुन
मुंडे साहेबांचे राहीलेले विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजाताईना
बहुमताने लोकसभेत पाठवा आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालण्याचे काम मायबाप जनतेने मतदानाच्या रूपाने पूर्ण होईल अशी विनंती बप्पासाहेब घुगे यांनी केली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचटणीस बप्पासाहेब घुगे,
उपसभापती लालासाहेब घुगे
पंचायत समितीचे माजी सदस्य बन्सी दुरगुडे, सरपंच कैलास घुगे, सरपंच अशोक शिंदे, नवनाथ खरात, पैलवान सुरेश घुगे, उपसरपंच लाला पन्हाळे, नवनाथभाऊ कुटे, व्यंकटी शिंदे
अंकुश तांदळे, शैनाथ गोरे, लिंबा शिंदे, नवनाथ घुगे, महादेव घुगे, सुरेश कदम, महादेव ठोबरे
भैय्या वाघमारे, व इतर मान्यवर उपस्थित होते.