सौ.ज्योती वैजवाडे यांना मातृभूमी प्रतिष्ठाणकडून भावपूर्ण श्रद्धांजली
बीड दि.१४(प्रतिनिधी)- बीड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक युवा सोबतीचे संपादक गुलाब भावसार यांची कन्या व छत्रपती संभाजीनगर येथील बजाज हॉस्पीटलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे धनंजय गोविंदराव वैजवाडे यांच्या पत्नी सौ.ज्योती धनंजय वैजवाडे यांचे वयाच्या 48 व्या वर्षी दिर्घ आजाराने छत्रपती संभाजीनगर येथे दि.10 मे 2024 रोजी निधन झाले. मातृभूमी प्रतिष्ठाण बीडच्या वतीने त्यांना नगर रोड वरील जिल्हा कार्यालयात दि.13 मे 2024 रोजी सौ.ज्योती वैजवाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी डॉ.संजय तांदळे, प्रा.बाळासाहेब नागरगोजे, पत्रकार आत्माराम वाव्हळ, पांडूरंग जायभाये, सतिश जायभाये, लक्ष्मण पवळ आदींची उपस्थिती होती.