06/09/25

जिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात… महेश भाऊ शिंदे यांच्या बैठकांना प्रचंड गर्दी! शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे

जिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…

महेश भाऊ शिंदे यांच्या बैठकांना प्रचंड गर्दी!

शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो-
महेश भाऊ शिंदे

बीड दि.१७ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात १३ मे रोजी शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर मी जनतेच्या दारात आलो आहे. आता मी मत मागण्यासाठी नाही तर माझं मत मांडण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच माझ्या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आहे. मी आपल्या व्यथा, वेदना समस्या आणि अडीअडचणी जाणून घेऊन त्या माणुसकी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे. ही ओळख पुसण्यासाठी आणि गरिबीत जीवन जगणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या माता-भगिनींच्या हाताला काम देण्यासाठी येत्या काही दिवसातच ठोस अशी उपाययोजना करणार आहे. हे सांगण्यासाठी आपल्या दारात आलो अशा शब्दांत बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा माणुसकी सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी गुरुवार दिनांक दि.१५ मे आणि १६ मे रोजी बीड जिल्ह्यातील विविध गावात सलग दोन दिवस भेटीगाठी झंझावाती दौऱ्यात जनतेशी संवाद साधताना सांगितले. या वेळी त्यांच्या समवेत बीड जिल्हाध्यक्ष सर्जेराव मस्के,अंकुश गंगावणे, विठ्ठलराव ढोकणे, बनसोडे, गणपत डोळस, सुखदेव लांडगे, आत्माराम वाव्हळकर, शिवप्रसाद सिरसाट, नितीन शिंदे, बिभीषण जावळे, भास्कर वाघमारे यांच्यासह आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा घेऊन जनसेवा करण्यासाठी बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र महेश शिंदे यांनी माणुसकी सेवा फाउंडेशनची स्थापना केली. या माणूसकी सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर भरीव असं काम करण्यासाठी सुरुवात केली आहे. यावेळी खऱ्या अर्थान जन्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी माता-भगिनी दीन दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे ठरवले. या अनुषंगाने मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जोरदार काम करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान लोकसभा 2024 साठी देशामध्ये तसेच राज्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यासाठी 13 मे रोजी मतदान पार पडल्यानंतर माणुसकी सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी सामाजिक कार्याला जोमाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून महेश भाऊ शिंदे यांनी 15 मे आणि १६ मे रोजी बीड जिल्ह्यात सलग दोन दिवस भेटीगाठीसाठी झंझावाती दौरा
धारूर, अंबेजोगाई, केज, वडवणी, यासह बीड तालुक्यातील प्रमुख गावात ज्यामध्ये अरणवाडी, चोरंबा, थेटेगव्हाण, सोनीमोहा, धुनकवड, आंबेवडगाव, तेलगाव, घाटजवळा, पिंपळनेर, दुसऱ्या दिवशी गुंदा, वडगाव, आहेर चिंचोली, ईट आणि जवळा यासह इतर अनेक गावांना भेटी दिल्या. महेश भाऊ शिंदे यांच्या प्रत्येक गावातील कॉर्नर बैठकांना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या बैठकी दरम्यान अनेकांनी आपल्या अडीअडचणी आणि समस्यांचा पाढा महेश भाऊ शिंदे यांच्यासमोर वाचला. त्यानंतर महेश भाऊ शिंदे यांनी जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महेश भाऊ शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी तुम्हाला येऊन भेटले असतील. प्रत्येक जणांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान द्या अशी विनंती केली असेल वेळप्रसंगी तुमच्या हातापाया पडत असतील आणि तुमचं अमूल्य मत माझ्याच पदरात टाका असं वारंवार म्हणत असतील परंतु आता काही निवडणुकीचा प्रचार राहिला नाही. त्यामुळे मी आता तुम्हाला तुमचं अमूल्य मत मागण्यासाठी इथे आलो नाही. तर मी तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. तुमच्या अडीअडचणी, तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी, तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आहे. वास्तविकरित्या खऱ्या अर्थाने दुःख काय असतं, दारिद्र्य कसं असतं मला माहित आहे. माझं बालपण गरीबीत गेल्यामुळे गरिबी, दुःख आणि दारिद्र्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे दुःखात आणि दारिद्र्यात माणूस कसा पिचला जातो. याचा संपूर्ण अनुभव मला मिळाला आहे. या अनुभवाची शिदोरी घेऊन साधुसंत आणि थोर महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाने मी काम करत आहे. साधू संतांचे, थोर महापुरुषांचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन माझ्या मनगटातील ताकदीच्या आणि बुध्दीच्या जोरावर मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाबरोबरच या देशाचे या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ही भावना मनाशी ठेवून स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आहे. थोर साधू संतांच्या महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन माणुसकी सेवा फाउंडेशन या नावाप्रमाणेच माणसा-माणसात लोप पावत चाललेला जिव्हाळा आपुलकी आणि प्रेमभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी, हरवत चाललेली माणुसकी पुन्हा एकदा लोकांना अनुभवायला लावण्यासाठी मी आज लोकांच्या दारात जात आहे. लोकांच्या समस्या, अडचणी समजून घेत आहे. शेतकरी शेतमजूर कष्टकरी माता-भगिनी दीन -दलित यांच्या सोबत विधवा, परित्यक्ता, वयोवृद्ध महिलांचे प्रश्न सोडवयाचे आहेत. मला माझ्या जिल्ह्यातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरण्यासाठी पाण्याचा कायम प्रश्न मिटविण्यासाठी मी शासनाच्या मदतीने ठोस उपाययोजना करणार आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी आणि गरिबीत जीवन जगणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या माता-भगिनींच्या हाताला काम देण्यासाठी येत्या काही दिवसातच शासनाच्या सहकार्याने, माणुसकी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून छोटे-मोठे उद्योग जिल्ह्यात सुरू करणार आहे. या योजना कशा राबवणार आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती यावेळी महेश भाऊ शिंदे यांनी दिली. प्रत्येक गावात महेश भाऊ शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भागवत साळवे, प्रकाश वेदपाठक, संजय सुरवसे, संजय तेलंग, अभिमन्यू साळवे, मल्हारी भालेराव, रोहिदास बनसोडे यांच्यासह प्रत्येक गावातील बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
___________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …