उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार!
बीड दि.20 (प्रतिनिधी)–
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख बारावी बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना निकालाची मोठी उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता आता संपली आहे. विद्यार्थ्यांना निकाल वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षा नंबर आणि आईचे नाव हे प्रविष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
निकाल इथे पहा