06/09/25

कु. प्रांजली गुजरचे दहावी परीक्षेत 91.00 % घेऊन मिळविले घवघवीत सुयश

कु. प्रांजली गुजरचे दहावी परीक्षेत 91.00 % घेऊन मिळविले घवघवीत सुयश

डोंगरकिन्ही दि.२८ (प्रतिनिधी):- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या दहावी बोर्ड परिक्षेत दैनिक पार्श्वभूमी पत्रकार गणेश गुजर यांची मुलगी कु. प्रांजली गणेश गुजर हिने 91.00% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नातेवाईक, ग्रामस्थ, मित्र परिवार यांनी अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रांजली गुजर ही दैनिक पार्श्वभूमी डोंगरकिन्ही प्रतिनिधी गणेश गुजर यांची मुलगी आहे. ती बीड येथील संस्कार विद्यालयात शिक्षण घेत होती. दहावी परीक्षेत तिला इंग्रजी -84, मराठी-90, हिंदी -87,गणित-85, विज्ञान-94, सामाजिक शास्त्रे-84, असे एकूण 455 गुण मिळविले. एकूण 91.00% गुण मिळवत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाली आहे.
तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे NEET क्लासेसमधील बायोलॉजीचे प्रा.भोसले सर, दहावी पर्यंतचे मार्गदर्शक श्री दत्तात्रय प्रभाळे सर, सनराईज क्लासेस चे सानप सर, सेवानिवृत्त वरिष्ठ लेखाधिकारी श्री मुरलीधर गुजर यांनी विशेष कौतुक केले आहे. प्रांजलीने पुढे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन गोरगरीबांची सेवा,रुग्ण सेवा करण्याचा मनोदय तिने संघर्ष यात्रा परिवाराशी बोलताना व्यक्त केला.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …