06/09/25
Oplus_0

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा

अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा

बीड दि.९(प्रतिनिधी)-
राज्यातील अंशतः अनुदानित शाळेंना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे या संदर्भामध्ये 25 जून पूर्वी निधीसह अनुदान वितरित करण्याची घोषणा करावी अन्यथा 27 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे यांनी दिला असल्याची माहिती कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर यांनी दिली
ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबई आझाद मैदानावर विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षका तर कर्मचाऱ्यांनी पुढील टप्पा वाढीसाठी मोठे आंदोलन केले होते. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 01 जानेवारी 2024 पासून टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या शासनाचे पूर्तता झाली नाही त्यामुळे टप्पा वाढ अनुदान मिळाले नाही. दरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने अनुदान टप्पावाढी प्रक्रिया थांबली. 4 जून पासून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहिता संपुष्टात आली आहे. आत्ता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येत आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर राज्य शासनाने टप्पा वाढ जाहीर करावी या साठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची काल ९ जून रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य शासनाने 25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करावी या प्रमुख मागण्यासह ६ फेब्रुवारी २०२३ नुसार ३० डिसेंबर २०२३ पर्यंत २०/४०/६० टक्के अनुदानास पात्र असलेल्या अनुदानावरील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकडया यांना दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासून वाढीव २०% वेतन अनुदान मंजूर करुन प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे, १५ नोव्हेंबर २०११ व ०४ जून २०१४ च्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सुत्र शाळांना लागु करून यापुढील प्रतिवर्षी ०१ जानेवारी पासूनच पुढील टप्पा देण्यात यावा, शासन निर्णय दि १२, १५ व २४ फेब्रुवारी २०२१ नुसार ३० दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्याने मागे राहिल्या आहेत. अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देवून ०१ जानेवारी २०२४ पासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणावे या मागण्यांच्या अनुषंगाने चालु पावसाळी अधिवेशनात निधीसह तरतूद करावी, अन्यथा येत्या २७ जून २०२४ पासून आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा
‌इशारा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर आणि
राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, यांनी दिला असल्याची माहिती कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांनी दिली.
___________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …