*जी चॅम्प स्टेट लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये गिते सर अबॅकस सेंटर चे पाच विध्यार्थी अव्वल*
बीड दि.30 (प्रतिनिधी )- संभाजीनगर येथे 23 जून 2024 रोजी झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये गीते सोमनाथ सरांच्या ‘जी चॅम्प अबॅकसच्या’ पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बौद्धिक क्षमता व एकाग्र क्षमता अबॅकस शिकल्याने विकसित होते. प्रति वर्षीप्रमाणे यावर्षी संभाजीनगर येथे झालेल्या स्टेट लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध जिल्ह्यामधून आलेल्या या स्पर्धकांमध्ये सोमनाथ गीते सरांच्या जी चॅम्प अबॅकस बीड चे एकूण दहा विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी मानवी नितीन हलकुडे आणि प्रथमेश नितीन बिनवडे यांना या कॉम्पिटिशन मध्ये थर्ड रँक ट्रॉफी, मेडल आणि जयहिंद सोमनाथ गीते याला फर्स्ट रँक ट्रॉफी व मेडल तर विनायक सुसेन वनवे सुपरस्टार विजेता ट्रॉफी मिळवून यश संपादन केले आहे.
या कॉम्पिटिशन मध्ये या स्पर्धकाने सात मिनिटात 100 गणिते सोडवली आहेत. यामुळे गणित असो वा विज्ञान या विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी अबॅकस कॉम्पिटिशन महत्त्वाचा भाग आहे. अबॅकस शिकताना एकाच वेळी सर्व अवयव ॲक्टिव्ह राहतात व एकाग्र क्षमता मुलांची विकसित होत राहते. या कॉम्पिटिशन मध्ये विराज नितीन हलकुडे, देवराज भरत नागरगोजे, दूर्वा भरत नागरगोजे, सानप प्रज्वल प्रल्हाद व आमटे सार्थक विजय या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविल्यामुळे त्यांचा गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बीड शहरातील धानोरा रोड व कालिका नगर परिसरातील नागरिकानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com