15/01/26

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

 श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल

संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान

श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

बीड दि.७(प्रतिनिधी)-दर्पण दिनाचे औचित्य साधून लोकशाही पत्रकार संघ व सोमेश्वर महादेव हनुमान मंदिर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘लोकरत्न पुरस्कार’ साप्ताहिक संघर्ष यात्राचे संपादक तथा बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ यांना मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी दर्पण दिनी बीड शहरातील सोमेश्वर मंदिर येथे आयोजित भव्य-दिव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना त्यांना मिळालेल्या लोक रत्न पुरस्कारामुळे दै. संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून श्री आत्माराम वाव्हळ सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दर वर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना लोकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. याच अनुषंगाने शिक्षण, समाजसेवा व पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आणि संघर्षमय योगदान देणाऱ्या श्री आत्माराम वाव्हळ सर यांची या वर्षीच्या लोक रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यातील विना अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत असताना, पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य आत्माराम वाव्हळ सर यांनी केले आहे. बीड तालुक्यातील शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात ते कार्यरत आहेत. आता पर्यंत त्यांना आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, तसेच आदर्श पत्रकार व संपादक अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. या वर्षीचा मानाचा समजला जाणारा लोक रत्न पुरस्कार मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता एका भव्य कार्यक्रमात बीडचे तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके, बीड नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैलेश फडशे, पेठ बीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारोती खेडकर, प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. रमेश घोडके, डॉ उर्मिला घोडके, सामाजिक कार्यकर्त्या सीमा ओस्तवाल, मयुरी बांगर मॅडम, निलाफर शेख मॅडम, तसेच प्रतापराव साळुंके, नवनाथ अण्णा शिराळे आणि भागवत वैद्य, यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करून त्यांच्या गौरव करण्यात आला.
या सन्मानामुळे श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारितेतील कार्याची पोचपावती मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, सध्या त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
______________

Check Also

उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन

उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे …