15/01/26

संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी संघर्षाचा दीपस्तंभ उजळला !

संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर दि.०५(प्रतिनिधी)-कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर शिक्षण संस्था, शहापूर संचलित विनायक हायस्कूल, शहापूर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक सोहळ्यात संघर्षयोद्धा शिक्षक नेते श्री खंडेराव जगदाळे सर यांना थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार व नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्री चेतन नरके, शहापूर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुमन शामराव चव्हाण यांच्या हस्ते ‘प्रेरणा पुरस्कार’ प्रदान देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विनायक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अशोक हुबळे, शिक्षक नेते श्री दत्ता पाटील, को. जि. मा. शि. चे उपसभापती सौ. ऋतुजा पाटील मॅडम, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संपर्क प्रमुख श्री इरफान अन्सारी, संचालक श्री हेमंत धनवडे, श्री मज्जिद पटेल, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे कौन्सिल सदस्य श्री अशोक निबाळकर, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती, हातकणंगलेचे अध्यक्ष श्री वि. ह. सपाटे
आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर शिक्षण संस्था, शहापूर संचलित विनायक हायस्कूल, शहापूर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांचा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि सन्मानपूर्ण जीवनासाठी आयुष्य झोकून देत संघर्ष करणारे संघर्षयोद्धा शिक्षक नेते श्री खंडेराव जगदाळे सर यांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी संघर्ष योद्धा शिक्षक नेते खंडेराज जगदाळे सर यांच्या कार्यावर विचार मांडले. यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी राज्यातील विनाअनुदानित
शिक्षकांच्या वेदना, प्रश्न आणि अडचणी शासनदरबारी ठामपणे मांडत त्यांना न्याय व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती देणारे खंडेराव जगदाळे सर आज संपूर्ण शिक्षण विश्वासाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव रौप्य महोत्सवी वर्षात होणे ही विनायक हायस्कूलसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असे
थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार व नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्री चेतन नरके, शहापूर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुमन शामराव चव्हाण यांनी व्यक्त केले. रौप्य महोत्सवाच्या पवित्र पर्वावर दिलेला हा सन्मान म्हणजे संघर्षाचा विजय, त्यागाचा गौरव आणि भावी पिढीसाठीचा प्रेरणादायी संदेश ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी खंडेराव जगदाळे सरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास सलाम केला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल खंडेराव जगदाळे सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, विनायक हायस्कूल, विनायक विद्यालय व विशाल विद्यालयाच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्ष योद्धा शिक्षक नेते खंडेराव जगदाळे यांना ‘प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात येत असताना सर्व उपस्थित मान्यवरांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात खंडेराव जगदाळे सरांच्या कार्याला सलाम केला. या वेळी संपूर्ण सभागृह भावनिक झाले होते.

Check Also

उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन

उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जितेंद्र डोंगरे …