06/09/25
Oplus_0

…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा!

…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे
“क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा!
बीड दि.९(प्रतिनिधी)
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे ठिबक , तुषार सिंचन संचाचे अनुदान अंदाजे 25 कोटी रुपये थकीत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2024(क्रांती दिनी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.आठ दिवसांत लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान वितरीत करा अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्य दिनी रोखण्याचा इशारा कुलदीप करपे यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन 2022-2023 व 2023 -2024 वर्षांत आपले शेतात ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच बसवले होते. अल्प भु धारक शेतकऱ्यांना 80 %व बहू भु धारक शेतकऱ्यांना 75%अनुदान राज्य शासनाने व केंद्र शासनाने निर्धारित केले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील तब्बल 8हजार शेतकऱ्यांचे अंदाजे 25 कोटी रुपये ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचे शेतकऱ्यांच्या बँकखात्यात अद्यापही मिळाले नाहीत.वारंवार शेतकऱ्यांनी विनंती करून देखील शासनाने सदर अनुदान वर्ग केले नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. यातील बऱ्याच पात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत तरीसुद्धा याविषयी शासन गांभीर्याने घेत नाही. सदर प्रश्नावर शासनाचे तीव्र लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत असलेले ठिबक व तुषार सिंचनाचे कोट्यवधी रुपये थकीत अनुदान तात्काळ विनाविलंब मिळविण्यासाठी व सन 2024 -2025 या चालु वर्षात ठिबक,तुषार सिंचन योजना लाभ घेण्यासाठी पूर्वसमंती देण्याच्या मुख्य मागण्या साठी शेतकरी क्रांती मोर्चा,महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2024 (क्रांतिदिनी) बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक(शिवतीर्थ) ते नगर रोड मार्गे , जिल्हाधिकारी कार्यालय ,बीड असा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नको रोडवर या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाले होती. मोर्चाचे निवेदन मोर्चेकरी शिष्टमंडळाने अप्पर जिल्हादंडा धिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मा. शिवकुमार स्वामी यांनादिले. या मोर्चात शेकडो शेतकरी बीड जिल्ह्यातुन सहभागी झाले होते.जेष्ठ शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख ,शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,शेकाप चे ऍड राजेंद्र नवले ,लोकशाही पत्रकार संघाचे अध्यक्ष भागवत वैद्य, हिराबाई कांबळे, अरूण खेमाडे ,जिल्हा ड्रिप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुदाम खोचरे ,शरद गोरे ,ऍड.अंबादास जाधव यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून मोर्चा ला पाठिंबा दिला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी शेतकरी क्रांति मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष आनंद ढाकणे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद इंगळे पाटील, बीड तालुकाध्यक्ष लहू गायकवाड पाटिल, पाटोदा तालुकाध्यक्ष आकाश चौरे, गेवराई तालुकाध्यक्ष उध्दव साबळे,
केज तालुकाध्यक्ष अतुल गवळी,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे, परळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण चाटे आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …