*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला*
*विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीसाठी 970कोटी रूपयांची तरतूद*
*5 जून 2025 पासून सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश*
*दि 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन ठरले निर्णायक*
बीड दि.17 (प्रतिनिधी)- 9 जुलै 2025 रोजी शिष्टमंडळाला शब्द दिल्याप्रमाणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.17 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत टप्पा वाढीचा विषय घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्प्यासाठी 970 कोटी ची तरतूद केली व 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार निधीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील 63 हजार शिक्षकांना न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 63 हजार शिक्षकांना पगार वाढीचा फायदा होणार आहे. टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद झाल्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करा या मागणीसाठी 5 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानासह राज्याभरात धरणे आंदोलन सुरू केले होते. 30 जूनला पुरवणी मागणी मध्ये टप्पा वाढीसाठी निधीची तरतूद होईल असे वाटत होते परंतु शासनाने कोणतीच तरतूद न केल्याने 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या बंद करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची शासनासह विरोधी पक्षांनी दखल घेतली होती. आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, विजय वडट्टीवार यांच्यासह आ. रोहित दादा पवार यांनी भेट देऊन मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे ठामपणे सांगितले. तेंव्हा शासनाने या शाळेच्या वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याचा योग्य निर्णय घेऊन, अधिवेशन संपण्यापूर्वी निधीची तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे आज गुरुवार दिनांक 17 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निधी तरतुदीचा विषय मंजूर करत या सर्व शाळांसाठी 970 कोटी रुपयांची तरतूद केली. शिवाय 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील 63 हजार शिक्षकांना फायदा मिळणार आहे. 5 जून पासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले हा शिक्षकांच्या एकीचा विजय आहे. यामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मोलाचा वाटा आहे, त्याच प्रमाणे आमदार मंगेशजी चव्हाण यांचे योगदान खूप मोठे आहे, तसेच सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांची प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळाले आहे. खरे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी जी एकी दाखवली व राज्यातील सर्व शाळा बंद करण्याबाबत जो निर्णय घेतला व त्या निर्णयाचा मान राखून सर्वानी शाळा बंद केल्या 20 ते25 हजार शिक्षक रस्त्यावर आले त्यामुळे हे यश मिळाले आहे. ही एकीची ताकद आपण दाखवली त्याचेच हे यश आहे. यामध्ये सर्व शिक्षक व पदवीधर आमदार तसेच काही माजी आमदार यांचा ही मोलाचा वाटा आहे. दरम्यान 5 जून पासून आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले. हा विजय शिक्षकांच्या एकीचा विजय आहे.यामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आ. मंगेश चव्हाण यांचे योगदान आहे. तसेच सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांच्या प्रयत्नांचे यश आहे. राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी एकत्रित लढा दिला. तसेच राज्यातील सर्व शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी शाळा बंद करुन 20 ते 25 हजार शिक्षक आझाद मैदानात उपस्थित राहिल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
आज गुरुवार दिनांक 17 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ना.गिरीशजी महाजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ना आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, ना प्रवीण दरेकर, आ. मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी खंडेराव जगदाळे, समीत कदम,विजयसिंह माने, पुंडलिक रहाटे वैद्यनाथ चाटे मच्छिद्र सावंत, संजय डावरे,सदानंद लोखंडे, अजेटराव एस डी लक्ष्मण सोळंखी, अजय थुल संतोष पाटील हे उपस्थित होते.
________________________________